Join us

IPL 2021: धोनीच्या CSK संघाला कसं पराभूत करता येईल? सेहवागनं दिला 'कानमंत्र'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 14:47 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाच्या कामगिरीवर खूप खूष झाला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून वीरुनं चेन्नईचा उल्लेख केला आहे.

2 / 8

आयपीएलच्या मागील पर्वात चेन्नई सुपरकिंग्जच्या संघानं गुणतालिकेत तळ गाठला होता. संघात असं निराशाजनक वातावरण असताना पुढल्याच वर्षी अशा पद्धतीनं जबरदस्त कमबॅक करणं ही गोष्टी खूपच वाखाणण्याजोगी असल्याचं सेहवान म्हणाला.

3 / 8

चेन्नई सुपर किंग्जचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. रविवारी संघानं दोनवेळा आयपीएलचं जेतेपद नावावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचा धुव्वा उडवला.

4 / 8

'चेन्नईचा संघ जेव्हा फॉर्मात असतो तेव्हा त्यांना कुणीही रोखू शकत नाही. गोलंदाजी हा त्यांचा कमकुवत दुवा आहे. कोलकाताला ते १५०-१६० धावसंख्येवर रोखू शकले असते. पण कोलकातानं १७१ पर्यंत मजल मारली', असं सेहवाग म्हणाला.

5 / 8

चेन्नईनं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत सामना जिंकला. रविंद्र जडेजानं अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत सामना खेचून आणला. चेन्नईच्या याच ताकदीचं सेहवागनं कौतुक केलं आहे.

6 / 8

'चेन्नईसारख्या मातब्बर संघाला हरवणं काही सोपी गोष्ट नाही. खरंतर चेन्नई प्रथम फलंदाजी करतात तेव्हा तर मोठं आव्हान असतं. कारण त्यांची रणनिती ठरलेली असते. त्यामुळे चेन्नई विरुद्ध फक्त २० षटकांमध्ये तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करुन चालत नाही', असं सेहवाग म्हणाला.

7 / 8

चेन्नई सुपर किंग्जला जर पराभूत करायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण ४० षटकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. ज्यापद्धतीनं आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करायचं असेल तर संपूर्ण ४० षटकांमध्ये तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागते असं म्हणतो. त्याच पद्धतीचा आयपीएलमधला सीएसकेचा संघ आहे', असं सेहवाग म्हणाला.

8 / 8

सामन्यात चेन्नईसमोर कितीही मोठं संकट असलं तरी प्रतिस्पर्धी संघाला एक चूक खूप महागात ठरणारी असते. एका चुकीमुळं तुम्ही सामना गमावू शकता. इतकं जबरदस्त टॅलेंट चेन्नई सुपरकिंग्जच्या संघात आहे, असंही तो म्हणाला.

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सविरेंद्र सेहवाग
Open in App