Flashback 2025: स्मृती मानधनाची कमाल! स्वत:चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

एका कॅलेंडर ईयरमध्ये १७०० धावांचा पल्ला पार करणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे.

टीम इंडियाची क्वीन स्मृती मानधना हिने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात ८० धावांची धमाकेदार खेळी साकारली.

जे आतापर्यंत कुणालाच नाही जमलं तो पल्ला तिने या वर्षी गाठला. इथं जाणून घेऊयात तिच्या खास वर्ल्ड रेकॉर्डसंदर्भातील गोष्ट

या खेळीत तिने अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यात सलग दुसऱ्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड तिने सेट केला आहे.

स्मृती माननधना हिने यंदाच्या वर्षात ३२ डावात १७०३ धावा केल्या आहेत. एका कॅलेंडर ईयरमध्ये १७०० धावांचा पल्ला पार करणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे.

याआधी एका कॅलेंडर ईयरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही स्मृतीच्या नावेच होता. २०२४ या कॅलेंडर ईयरमध्ये तिने ३५ डावात १६५९ धावा केल्या होत्या.

मागच्या दोन वर्षात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड ही स्मृती मानधनाला टक्कर देताना दिसली. पण दोन्ही वेळी भातीय बॅटरच्या मागेच राहिली.

२०२४ च्या कॅलेंडर ईयरमध्ये लॉरानं ३७ डावात १५९३ धावा केल्या होत्या. स्मृती पेक्षा ५ सामने अधिक खेळून ती खूपच मागे पडली होती.

२०२५ च्या कॅलेंडर ईयरमध्ये लॉरानं आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये २६ डावात १३६४ धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत ती सर्वाधिक धावा करणारी बॅटर ठरली.

इंग्लंडची नॅटली सायव्हर ब्रंट (Nat Sciver-Brunt) ही देखील एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला बॅटर्सच्या यादीत आहे. तिने २०२२ च्या हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३२ डावात १३४६ धावा केल्या होत्या.

स्मृती मानधनाने सलग दुसरे वर्ष गाजवताना महिला क्रिकेटमध्ये आपली खास छाप सोडल्याचे पाहायला मिळते.