WTC Points Table : इंग्लंड टॉपला; बांगलादेश अन् श्रीलंका संघ ठरला टीम इंडियापेक्षा भारी!

चौथ्या हंगामात या चार संघांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला केलीये सुरुवात

भारतीय संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी मालिका जिंकत इंग्लंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात अगदी धमाक्यात केली आहे.

लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातील विजयासह इंग्लंडच्या खात्यात १२ गुण जमा झाले असून १०० टक्के विजयी टक्केवारीसह इंग्लंडचा संघ WTC गुणतालिकेत टॉपला विराजमान झाला आहे.

दुसरीकडे पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाच्या पदरी भोपळा पडला आहे.

आतापर्यंत दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळणारा भारतीय संघ बांगलादेश आणि श्रीलंकेच्याही मागे पडला आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या हंगामाची सुरुवात ही इंग्लंड-भारत यांच्यातील सामन्यासह नव्हे तर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसह झाली आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील गॉले कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी ४-४ गुण मिळाले आहेत.

WTC गुणतालिकेत बांगलादेशचा संघ ३३.३३ विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेच्या खात्यातही ४ गुण आणि विजयाची टक्केवारी ही बांगलादेशप्रमाणेच ३३.३३ असली तरी WTC गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. कारण सामना अनिर्णित करण्यात ते यशस्वी ठरले असले तरी बांगलादेशच्या तुलनेत मागे पडले होते.