Join us  

WTC Final, Ravi Shastri : रवी शास्त्री यांनी कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला दिला त्रिसूत्री मास्टरप्लान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 2:18 PM

Open in App
1 / 10

2 / 10

१८ ते २३ मे या कालावधीत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल ( ICC World Test Championship) न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. ४ ऑगस्टपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

3 / 10

३ जूनला भारतीय संघ लंडनमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर कोरोना नियमानुसार त्यांना विलगीकरणात रहावे लागेल. त्यामुळे तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारतीय खेळाडूंना फार कमी कालावधी मिळणार आहे.

4 / 10

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी त्यावरचा तोडगा शोधून काढला आहे. रवी शास्त्री यांनी त्रिसूत्री मास्टरप्लान तयार केला आहे आणि त्याचा भारतीय खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.

5 / 10

१ - रोबो आर्मवर सराव करण्यासाठी शास्त्री यांनी खेळपट्टी २२ यार्डाऐवजी १६ यार्डाची केली आहे. त्यामुळे फलंदाजांना नेट्समध्येच अधिक वेगानं येणाऱ्या चेंडूचा सामना करण्याचा सराव करता येईल. लंडनमधील खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना पोषक समजल्या जातात.

6 / 10

२ - अधिक चकाकी असलेल्या चेंडूवर सराव करून घेणार. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात चेंडू कधी सोडायला हवा अन् कधी त्यावर खेळायला हवं, याचा सराव फलंदाजाना होईल.

7 / 10

३ - कसोटी क्रिकेटमध्ये चेंडूला फटका मारण्यापेक्षा योग्यवेळी तो सोडण्याची कला महत्त्वाची आहे. याचं प्रशिक्षणही नेट्समध्ये दिले जाणार आहेत.

8 / 10

या त्रिसूत्रीमुळे भारतीय फलंदाजांना इंग्लंडमध्ये शतक करण्यास मदत मिळेल. भारत आणि लंडन येथील वातावरण परस्पर विरोधी आहे. येथे जलदगती गोलंदाजांनी स्वींग व सीम करण्यात अधिक मदत मिळते आणि अशा परिस्थितीचा सामना करताना भारतीय फलंदाज अनेकदा चाचपडताना दिसले आहेत.

9 / 10

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला.

10 / 10

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धारवी शास्त्रीभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध न्यूझीलंड