रंगात रंगले मी! स्मृती मानधना, एलिसे पेरीसह RCBच्या खेळाडू खेळल्या धुलीवंदन, Photo

WPL 2023 ; भारतात आज मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा केला गेला... रंगांची उधळण करून एकमेकांना उत्साहात रंग लावून हा सण आज साजरा झाला.

भारतात आज मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा केला गेला... रंगांची उधळण करून एकमेकांना उत्साहात रंग लावून हा सण आज साजरा झाला.

महिला प्रीमिअर लीगच्या धामधुमीतही खेळाडूंना धुलीवंदन खेळण्याचा मोह आवरता आला नाही. RCBच्या खेळाडूंनी धुलीवंदन साजरा केला.

कर्णधार स्मृती मानधना, रिचा घोष आदी भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंनीही या सणाचा आनंद लुटला. RCB ने त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

RCBला महिला प्रीमिअर लीगमध्ये साजेशी सुरुवात करता आलेली नाही आणि त्यांना दोन्ही सामन्यांत सपाटून हार पत्करावी लागली,

WPL मधील सर्वात महागडी खेळाडू स्मृती मानधनाची कामगिरी काही खास होताना दिसत नाही, काल मुंबई इंडियन्सने 9 विकेट्सने त्यांना पराभूत केले.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करणाऱ्या RCBचा डाव 155 धावांत गुंडाळला, हेली मॅथ्यूजने 3, साइका इसाक व एमेलिया केर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

हेली मॅथ्यूजने फलंदाजीत 38 चेंडूंत नाबाद 77 व नॅट शिव्हर-ब्रंटने 29 चेंडूंत 55 धावा करून मुंबई इंडियन्सचा विजय पक्का केला.