Join us  

१० वी नापास...पण कमाई १० लाख; झोपडीत राहणारी क्रिकेटपटू WPL मध्ये धमाका करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 10:38 AM

Open in App
1 / 8

Womens Premier League 2023 मध्ये रविवारी यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स असा सामना होणार आहे. यात युवा महिला क्रिकेटपटू सिमरन शेख हिला संधी मिळण्याची शक्यता आहे.

2 / 8

WPL 2023 स्पर्धेची सुरुवात एकदम धूमधडाक्यात झाली आहे. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सनं गुजरात जाएंट्सचा १४३ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं. मुंबईच्या विजयाची शिल्पकार ठरली ती कर्णधार हरमनप्रीत कौर. तिनं वादळी फलंदाजी करत ३० चेंडूंमध्ये ६५ धावा ठोकल्या.

3 / 8

पण आज डब्ल्यूपीएलमध्ये, एक अशी क्रिकेटपटू मैदानावर उतरणार आहे जिची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहण्यासाठी संपूर्ण जग आतूर आहे. हे नाव आहे सिमरन शेख. जी यूपी वॉरियर्स संघाचा एक भाग आहे. यूपीचा संघ रविवारी गुजरात जाएंट्सचा सामना करणार आहे. सिमरनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

4 / 8

सिमरन शेख आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारवीमध्ये राहते. सिमरन अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. तिला ७ भावंडं आहेत आणि वडील वायरिंगचं काम करतात.

5 / 8

सिमरन इयत्ता १० वीच्या परीक्षेत नापास झाली आणि तिनं अभ्यास करणं सोडून दिलं. पण क्रिकेटच्या मैदानात मात्र ती एकापेक्षा एक विक्रम रचत होती.

6 / 8

सिमरन शेख ही एक उत्तम फलंदाज आणि एक जबरदस्त लेग स्पिनर आहे. सिमरन मधल्या पट्टीतील खेळाडू आहे आणि ती धडाकेबाज फटक्यांसाठी ओळखली जाते.

7 / 8

सिमरन शेखला १० लाख रुपयांच्या यशस्वी बोलीवर यूपी वॉरियर्सने संघात समाविष्ट केलं आहे. सिमरन शेख हिला बेस प्राइजमध्येच खरेदी केलं गेलं असलं तरी तिच्या कामगिरीची किंमत नक्कीच अनेक पटीनं जास्त आहे.

8 / 8

गेल्या वर्षी सिमरन शेख Senior Women's T20 Challenger Trophy मध्ये खेळली होती. या २१ वर्षांच्या युवा खेळाडूचं टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न आहे. डब्ल्यूपीएलमुळे तिच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी नक्कीच पंख मिळू शकतात.

टॅग्स :टी-20 क्रिकेट
Open in App