Join us  

VIVO ची आयपीएलमधील स्पॉन्सरशिप राहणार की जाणार? बीसीसीआयने दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 8:22 PM

Open in App
1 / 7

लडाखमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी आणि परवा गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे.देशातील सर्व स्तरांमधून चीनचा निषेध करून चीन आणि चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे.

2 / 7

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचा प्रभाव आयपीएलवरही पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएलमधील टायटल स्पॉन्सर VIVO ही चिनी मोबाईल कंपनी आहे. मात्र सध्या भारतामध्ये चिनी उत्पादनांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर VIVO कडे असलेल्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

3 / 7

VIVO ही चीनमधील मोबाईल फोन निर्माती कंपनी असून, गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर देशातील लोकभावनांचा आदर करून बीसीसीआयने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

4 / 7

जर भारत सरकारने देशामध्ये चिनी मोबाईलच्या विक्रीवर बंदी आणली तर बीसीसीआयसुद्धा सरकारच्या या निर्णयाचे पालन करेल. तसेच VIVOला आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपवरून हटवेल, असे बीसीआयने स्पष्ट केले आहे.

5 / 7

मात्र बीसीसीआयने VIVO बाबत आपले मत स्पष्ट करतानाच बीसीसीआय ही सरकारला आपल्या उत्पन्नामधील एकूण ४० टक्के रक्कम कर म्हणून देते. त्याचा उपयोग देश आणि देशवासियांनाच्या हितांसाठी केला जातो, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

6 / 7

चिनी स्मार्टफोन कंपनी असलेल्या VIVO ने २०१८ मध्ये २१९९ कोटी रुपये खर्च करून आयपीलएची टायटल स्पॉन्सरशिप पाच वर्षांसाठी खरेदी केली होती.

7 / 7

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे बीसीसीआयने आयपीएल २०२० अनिश्चितकाळासाठी स्थगित केली आहे. मात्र आयपीएलचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :आयपीएलबीसीसीआयविवोभारतचीनआयपीएल 2020