Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

Ind Vs Aus,1st ODI: देशभरात दिवाळीचा उत्साह सुरू झाला असताना रविवारपासून भारतीय क्रिकेटप्रेमींना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेची धमाकेदार मेजवानी मिळणार आहे. तसेच या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन दिग्गज भारतीय फलंदाज दीर्घकाळानंतर क्रिकेटच्या मैदानात दिसणार असल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्या कामगिरीवर असतील. दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे या मालिकेत ७ मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी असेल, हे विक्रम पुढील प्रमाणे.

देशभरात दिवाळीचा उत्साह सुरू झाला असताना रविवारपासून भारतीय क्रिकेटप्रेमींना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेची धमाकेदार मेजवानी मिळणार आहे. तसेच या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन दिग्गज भारतीय फलंदाज दीर्घकाळानंतर क्रिकेटच्या मैदानात दिसणार असल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्या कामगिरीवर असतील. दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे या मालिकेत ७ मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी असेल, हे विक्रम पुढील प्रमाणे.

विराट कोहलीला (१४,१८१ धावा) कुमार संगकारा (१४ हजार २३४ धावा) याला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धाव बनवणारा फलंदाज ५४ धावांची आवश्यकता आहे. या यादीत सचिन तेंडुलकर हा १८ हजार ४२६ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी विराट कोहलीला (१८ हजार ३६९ धावा) ६७ धावांची आवश्यकता आहे. सध्या सचिन तेंडुलकर १८ हजार ४३६ धावांसह या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३४४ षटकार ठोकणाऱ्या रोहित शर्माला वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनण्यासाठी ८ षटकारांची आवश्यकता आहे. सध्या या क्रमवारीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ३५१ षटकारांसह पहिल्या स्थानी आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत ४९९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत केवळ एक सामना खेळला तरी तो ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा केवळ पाचवा भारतीय फलंदाज ठरेल. याआधी सचिन तेंडुलकर (६५०), विराट कोहली (५५०), महेंद्रसिंग धोनी (५३८) आणि राहुल द्रविड (५०९) हे भारतीय क्रिकेटपटून ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

रोहित शर्माने वनडेमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये ९९० धावा काढल्या आहेत. आता आणखी १० धावा काढल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात १००० धावा काढणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरेल.

रोहित शर्माने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके ठोकली आहेत. आता शतकांचं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला एका शतकाची आवश्यकता आहे. त्यामुळे या मालिकेत एक शतक ठोकल्यास आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा रोहित शर्मा हा जगातील नववा आणि तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर (१०० शतके) पहिल्या आणि विराट कोहली (८२ शतके) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये आतापर्यंत प्रत्येकी ८ शतके ठोकली आहेत. आणखी एक शतक ठोकल्यास ते या क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरची बरोबरी करतील.