Join us

IPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

By स्वदेश घाणेकर | Updated: September 26, 2020 15:33 IST

Open in App
1 / 9

Indian Premier League ( IPL 2020) मधील सर्वात यशस्वी संघांमध्ये मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांचा क्रमांक येतो. CSKने IPL ची तीन जेतेपदं नावावर केली आहेत. पण, UAEत होत असलेल्या IPLच्या 13व्या पर्वात CSKसमोरील अडचणी कायम आहेत.

2 / 9

चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) शुक्रवारी सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा मधल्या फळीतील अपयशानं CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) ची चिंता वाढवली.

3 / 9

सुरेश रैनानं ( Suresh Raina) वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानं संघातील त्याची जागा घेण्यासाठी तितकाच तगडा पर्याय CSKला सापडलेला नाही.

4 / 9

त्यात शुक्रवारी दिल्ली कॅपटिल्सकडून ( Delhi Capitals) झालेल्या पराभवानंतर सुरेश रैनाच्या कमबॅकची चर्चा सुरू झाली आहे. काही वेबसाईट्सनी तर Suresh Raina लवकरच कमबॅक करेल, असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यावर CSK CEO कासी विश्वनाथन यांनी मोठी अपडेट्स दिले आहेत.

5 / 9

CSKचे CEO कासी विश्वानाथन यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. ANIशी बोलताना विश्वनाथन यांनी सांगितले की,''आम्ही रैनाच्या पुनरागमनाचा विचार करत नाही, कारण त्यानं वैयक्तिक कारणास्तव स्वतःला यंदाच्या लीगमधून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. त्याला त्याची स्पेस देतो.''

6 / 9

आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांत MS Dhoniनं मुरली विजयला ( Murali Vijay) आणि ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) यांना अनुक्रमे सलामी व मधल्या फळीत खेळवले. पण, दोघांनीही निराश केले.

7 / 9

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मॅच विनिंग खेळी करणाऱ्या अंबाती रायुडू ( Ambati Rayudu)ला दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळे आता सुरेश रैनाच्या वापसीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

8 / 9

CSKचे CEO कासी विश्वानाथन यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. ANIशी बोलताना विश्वनाथन यांनी सांगितले की,''आम्ही रैनाच्या पुनरागमनाचा विचार करत नाही, कारण त्यानं वैयक्तिक कारणास्तव स्वतःला यंदाच्या लीगमधून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. त्याला त्याची स्पेस देतो.''

9 / 9

''जगभरात आमचा चाहतावर्ग आहे आणि मी त्यांना ही खात्री देऊ इच्छितो की, आम्ही दमदार पुनरागमन करू. हा खेळ आहे आणि त्यात कधी चांगले दिवस असतात, तर कधी वाईट. खेळाडूंना माहित्येय त्यांना काय करायचे आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर लवकरच आनंद परतेल,''असेही ते म्हणाले.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्ससुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीअंबाती रायुडू