पतीच्या द्विशतकानंतर पत्नी इमोशनल; अशी होती मॅक्सवेल अन् विनीची लव 'स्टोरी'

ऑस्ट्रेलियाचा धुव्वादार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. अफगाणिस्तानच्या २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळली होती.

ऑस्ट्रेलियाचा धुव्वादार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. अफगाणिस्तानच्या २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळली होती.

मात्र, मॅक्सवेलने एकाकी खिंड लढवत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला, या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. १२८ चेंडून मॅक्सवेलन २०१ धावा केल्या.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पहिलं द्विशतक ठोकल्यामुळे ग्लेन मॅक्सवेलचं सर्वत्र कौतुक होत आहे. १० षटकार आणि २१ चौकारांची आतिषबाजी करत त्याने अफलातून फटकेबाजी केली.

मॅक्सवेलच्या या द्विशतकानंतर क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या खेळीचं विराट कौतुक केलं आहे.

जगभरातून कौतुक होत असताना मॅक्सवेलची पत्नी विनी रमन हिनेही इंस्टाग्राम स्टोरी ठेऊन पतीच्या द्विशतकी खेळीवर इमोशनल प्रतिक्रिया दिली.

इंस्टा स्टोरी ठेऊन तिने लव्ह स्टोरीच सांगितली आहे. विनीने इंस्टाग्राम स्टोरीवर क्रिकेटच्या मैदानाचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, अनेक प्रेमाच्या इमोजी लावल्या आहेत. सोबतच, ''सगळ्या भावना २०१'' असं कॅप्शन तिने दिलंय.

विनी रमन ही मूळ भारतीय वंशाची असून ऑस्ट्रेलियाची नागरिक आहे. तिचा जन्मही ऑस्ट्रेलियात झाला. मात्र, देशातील तामिळनाडूशी तिचं खास नातं आहे. मार्च २०२२ मध्ये मॅक्सवेल आणि विनी यांनी लग्न केलं.

सन २०२० मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र, कोरोनामुळे दोघांना लग्न करण्यासाठी २ वर्षांची वाट पाहावी लागली. विनीने ऑस्ट्रेलियातच आपलं शिक्षण पूर्ण केलं.

२०१३ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान विनी आणि मॅक्सवेल यांची भेट झाली होती. विने स्वत: याबद्दल माहिती दिली होती. मॅक्सवेलनेच तिला प्रपोज केला होता.

पहिल्या भेटीनंतर ४ वर्षे दोघे रिलेशनशीपमध्ये होते. २०१७ मध्ये त्यांनी चाहत्यांसाठी जाहीरपणे नात्याची कबुली दिली. विशेष म्हणजे याच वर्षी दोघेही आई-वडिल बनले असून गोड मुलीला विनीने जन्म दिलाय.