क्रिकेटवर्तुळात सध्या रंगलीये एका तरुणीच्या हॉटनेसची चर्चा; जाणून घ्या कोण आहे 'ती'? (Photos)

Who is Beautiful Hot Cricket Mystery Girl : क्रिकेट आणि ग्लॅमर हे समीकरण क्रीडाप्रेमींसाठी नवीन नाही. क्रिकेटच्या मैदानाला कायमच ग्लॅमरचा तडका दिला जातो.

क्रिकेट आणि ग्लॅमर हे समीकरण क्रीडाप्रेमींसाठी नवीन नाही. क्रिकेटच्या मैदानाला कायमच ग्लॅमरचा तडका दिला जातो.

हल्ली जगभरात विविध लीग स्पर्धा सुरु असतात. या स्पर्धांमध्ये होस्ट म्हणून काम करण्यासाठी अनेक तरुणींना संधी दिली जाते.

सध्या बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत ही तरुणी चित्तगाँव किंग्ज संघासोबत कायम दिसते.

या सुंदर, हॉट अन् फिट तरुणीची सध्या क्रिकेटवर्तुळात खूपच चर्चा रंगली आहे. जाणून घेऊया ती तरूणी नेमकी कोण...

एका मिस्ट्री गर्लने तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे.

या हॉट अँड फिट तरुणीचं नाव आहे येशा सागर (Yesha Sagar). सध्या तिच्या सौंदर्यामुळे ती क्रिकेटवर्तुळात प्रचंड चर्चेत आहे.

आजकाल, येशा सागर बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये दिसत असून तिच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

येशा सागर ही एक प्रसिद्ध क्रीडा अँकर आहे. येशा सागरचा जन्म १४ सप्टेंबर १९९५ रोजी पंजाबमध्ये झाला.

भारतात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर येशा सागर २०१५ मध्ये कॅनडाला गेली. ती सध्या कॅनडातील टोरंटो येथे राहते.

येशा सागरने ग्लोबल कॅनडा टी२० लीगमध्ये आपला ठसा उमटवला. स्पोर्ट्स अँकर होण्यापूर्वी तिने कॅनडामध्ये मॉडेलिंग केलंय.

येशा अभिनेत्री म्हणूनही काम करत होती. तसेच ती सोशल प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स आहेत.

येशाने परमिश वर्मा, अर्श बेनिपाल, गिप्पी ग्रेवाल, प्रेम ढिल्लन यासारख्या कलाकारांसोबत अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत.

येशा सध्या क्रिकेटच्या मैदानावर आपल्या सौंदर्याची चाहत्यांना मोहिनी घातलाना दिसते आहे. त्यामुळेच ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.

येशा सोशल मीडियावर अकाऊंटवरून वारंवार आपले अपडेट्स देत असते. तसेच फोटो, व्हिडीओदेखील शेअर करत असते.

चाहतेदेखील येशा सागरबद्दल जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक असतात. त्यामुळे येशाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते व्यक्त होतात.