भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलाचा नुकताच साखरपुडा उरकला आहे. यामुळे अर्जुन तेंडुलकर चर्चेत आला आहे. अशातच आज पी. अर्जुन तेंडुलकर या नावाच्या आणखी एका खेळाडूचे नाव चर्चेत आले आहे. तो देखील मुंबईचाच आहे. पी अर्जुन तेंडुलकरने केवळ १२ चेंडूत तीन चौकार आणि ३ षटकार ठोकत ३१ धावांचा पाऊस पाडला आहे.
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण असा सवाल अनेकांच्या मनात आला आहे. भीमावरम बुल्स विरुद्ध काकीनाडा किंग्ज सामन्यात त्याने तुफानी खेळी केली आहे. यामुळे त्याच्या नावाची चर्चा इंटरनेटवर सुरु झाली आहे.
आंध्र प्रीमियर लीगचा हा सामना होता. भीमावरम बुल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून २१४ धावा केल्या होत्या. एवढा धावांचा डोंगर होता, पी. अर्जुन तेंडुलकरचा संघ काकीनाडा किंग्ज दबावाखाली खेळेल असे वाटत होते. पण...
काकीनाडाच्या फलंदाजांनीही मैदानात धुमाकूळ सुरु केला. २० वर्षीय सलामीवीर पिट्टा अर्जुन तेंडुलकर आणि श्रीकर भरत यांनी विध्वंसक फलंदाजी सुरू केली. अर्जुनने फक्त १२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारत ३१ धावा चोपल्या. श्रीकर भरतने ४० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७६ धावा काढल्या.
परंतू, अर्जुनच्या संघाचे खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले आणि 19.5 ओव्हरमध्ये 187 च रन्स बनवू शकले. इतरही खेळाडू चांगले खेळले परंतू नाव मात्र पी अर्जुन तेंडुलकरचे झाले.
पिट्टा अर्जुन तेंडुलकरचा जन्म हा मुंबईत झालेला आहे. तो सध्या २० वर्षांचा आहे. पी अर्जुन हा उजव्या शैलीचा फलंदाज आणि गोलंदाजही आहे. कालच्या सामन्यात पी अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या सत्यनारायण राजू या गोलंदाजाने पॅव्हेलिअनमध्ये पाठविले आहे.