RCB ने डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) ३ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवला. RCBला या लढतीत १२९ धावांचे लक्ष्य गाठताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली.
दिनेश कार्तिकने विजयी चौकार मारताच RCB च्या डग आऊटमध्ये एकच जल्लोष झाला. मॅन ऑफ दी मॅच विनर ठरलेला वनिंदू हसरंगा विजयानंतर उड्या मारू लागला आणि त्याचा हा आनंद बाजूला उभी असलेली नवनिता गौतम पाहतच बसली.
कोण आहे ही नवनिता गौतम?
नवनिता गौतम असे या मुलीचे नाव आहे आणि RCBच्या सपोर्ट स्टाफची ती सदस्य आहे.
नवनिताचे RCBसोबत काम करण्याचे तिसरे वर्ष असून गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात RCBने तिच्यासोबत करार केला.
नवनितानं यापूर्वी क्रिकेटपटू आणि इतर खेळाडूंबरोबर काम केलेलं आहे.
मूळची कॅनडाची असणाऱ्या नवनिताने यापूर्वी ग्लोबल ट्वेंटी-२० कॅनडा लीगमधील टोरांटो नॅशनल्स या संघासाठी काम केलं आहे. त्याशिवाय बास्केटबॉल आशिया कपमध्ये तिने भारतीय महिला संघासोबत काम केलं आहे.