कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीगमधील लढतीत एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली. ब्रेबॉर्न स्टेडियमर रंगलेल्या या लढतीत दिल्लीने ४४ धावांनी विजय मिळवला. पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) व खलिल अहमद यांनी गोलंदाजीत कमाल दाखवताना दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला.
सलामीवीर पृथ्वी शॉ ( ५१) व डेव्हिड वॉर्नर ( ६१) यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करताना मजबूत पाया रचला. कर्णधार रिषभ पंत ( २७), अक्षर पटेल ( २२*) व शार्दूल ठाकूर ( २९*) यांनीही योगदान दिले. कोलकाताच्या सुनील नरीनने दोन विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सने ५ बाद २१५ धावांचा डोंगर उभा केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेला जीवदान मिळूनही फार मोठी खेळी करचा आली नाही. श्रेयस अय्यर ( ५४) व नितीश राणा ( ३०) यांच्यानंतर आंद्रे रसेल ( २४) कोलकाताच्या विजयासाठी संघर्ष करताना दिसला. पण, खलिलने २५ धावांत ३ विकेट्स व कुलदीपने ३५ धावांत ४ विकेट्स घेत त्यांचा पराभव पक्का केला. शार्दूलने २ विकेट्स घेतल्या.
दिल्लीने विजयासाठी ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ १७१ धावांत तंबूत परतला. पण, आयपीएल म्हटले की ग्लॅमरचा तडका आलाच, त्यामुळे खेळाडूंची कामगिरी सोडून एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने मारलेल्या षटकारावरील तिची रिअॅक्शन फार चर्चेत आली. अजिंक्य रहाणेला बाद दिले तेव्हाही ती एकदम स्तब्ध झालेली दिसली. त्यावरून ती KKR ची फॅन असावी हा अंदाज अनेकांनी बांधला.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिसलेली ही मिस्ट्री गर्ल अभिनेत्री निघाली. आरती बेदी ( Aarti Bedi) असे तिचे नाव असून तिने काही जाहीरातींमध्ये काम केले आहे.
सोशल मीडियावर तिचे ३६ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तिच्या हॉट फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळतोय...