Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे Macneil Hadley Noronha? अनकॅप्ड भारतीय अष्टपैलूची CSK च्या ताफ्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 00:55 IST

Open in App
1 / 7

आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने IPL लिलावात अनसोल्डचा ठपका लागलेल्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूला वाइल्ड कार्ड एन्ट्रीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.

2 / 7

चेन्नईच्या संघाने दुखापतग्रस्त रामकृष्ण घोष याच्या बदली खेळाडूच्या रुपात २४ वर्षीय अष्टपैलू मॅकनील हॅडली नोरोन्हा याला आपल्या संघात सामील केले आहे.

3 / 7

मॅकनील हॅडली नोरोन्हा हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकच्या संघाकडून खेळतो. उजव्या हाताने तुफान फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा हा खेळाडू उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो.

4 / 7

मॅकनील नोरोन्हा याने कर्नाटकच्या संघाकडून आतापर्यंत फक्त ३ टी-२० सामने खेळले आहेत.

5 / 7

CK Nayudu Trophy 2024-25 स्पर्धेत त्याने १४ डावांत ७९.७७ च्या सरासरीसह १०३७ धावा करुन सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. या स्पर्धेत त्याने ३ शतके आणि २ अर्धशतके झळकावली. यात त्रिपुरा विरुद्ध ३४५ धावांच्या सर्वोच्च खेळीचा समावेश आहे.

6 / 7

कर्नाटकमधील महाराजा टी २० ट्रॉफी २०२५ च्या हंगामात त्याने मंगलुरू ड्रॅगन्सकडून १३ सामन्यांत १४८.८२ च्या स्ट्राइक रेटने २५३ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने १९ षटकार मारले आणि गोलंदाजीत ७.४४ इकॉनॉमीने १० विकेट्सही घेतल्या.

7 / 7

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाल्यावर IPL मध्ये पदार्पणाची संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग