भारताचा स्टार अन् स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉ फिल्डबाहेरील गोष्टींमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
क्रिकेटर नुकताच एका सुंदरीसोबत स्पॉट झाला. पापाराझींना पाहून ती चेहरा लपवताना दिसली. अन् पृथ्वीची ती नवी गर्लफ्रेंड असल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.
त्यात पृथ्वी शॉ सोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या निधी तपाडियाच्या पोस्टची भर पडलीये. संकटात असताना एखाद्याला साथ द्या अन् मग धोका सहन करा, अशा आशयाची पोस्ट करत निधीनं क्रिकेटरला धोकेबाज ठरवल्याचे दिसून येते.
निधी तपाडियाची पोस्ट पृथ्वी शॉसोबत दिसलेली सुंदरी त्याची नवी गर्लफ्रेंड असल्याची पुष्टी करणारी आहे. क्रिकेटरनं यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.
इथं जाणून घेऊयात कोण आहे ती सुंदरी? जी पृथ्वीची नवी गर्लफ्रेंड असल्याची रंगलीये चर्चा
पृथ्वी शॉसोबत दिसलेल्या सुंदरीचं नाव आकृती अग्रवाल असं आहे.
ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि अभिनेत्रीच्या रुपात आपली ओळख निर्माण करत आहे.
डान्स आणि सिगिंगचा छंद जोपासणारी आकृती टिक टॉकवर शॉर्ट व्हिडिओ करायची. आता इन्साग्रामवर तिने आपला वेगळा चाहतावर्ग कमावला आहे. इन्स्टाग्रामवरील तिच्या फॉलोअर्सचा आकडा ३.४ मिलियनच्या घरात आहे.
पृथ्वीसोबत नाव जोडल्यावर तिच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडेल, यात शंका नाही. पण दोघे आपल्या रिलेशनशिपवर कधी उघड बोलणार तेही पाहण्याजोगे असेल.