Join us  

Who is Akash Madhwal? इंजिनिअर, टेनिस बॉल क्रिकेटर अन् आता मुंबई इंडियन्सचा विकेट टेकर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 7:34 PM

Open in App
1 / 8

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळणारा आकाश हा उत्तराखंड राज्य क्रिकेट संघातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत सीजन बॉलने तो खेळलाच नव्हता आणि त्याने काल मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

2 / 8

भरपूर टेनिस बॉल क्रिकेट खेळत असल्याने, गती होती पण अचूकतेची कमतरता होती. तो त्याच्या गोलंदाजीवर खूप प्रयोग करत असे. गेल्या वर्षी सूर्यकुमार यादवच्या दुखापतीनंतर बदली खेळाडू म्हणून बदली खेळाडू म्हणून माढवाल मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आणि आता तो रोहित शर्माचा मुख्य गोलंदाज बनला आहे.

3 / 8

कालच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने हेनरिच क्लासेन व हॅरी ब्रूक यांचा दांडा उडवून धावगती रोखली. त्याने काल एकूण चार विकेट्स घेतल्या. गेल्या आठवड्यात त्याने रिद्धिमान साहा, शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट घेतल्या होत्या.

4 / 8

२९ वर्षीय मढवालने प्रथम विवरांत शर्मा आणि मयांक अग्रवाल यांची १४० धावांची भागीदारी तोडली. पुढच्याच षटकात त्याने अग्रवालची विकेट घेतली. शेवटच्या षटकात त्याने आपला सर्वोत्तम मारा करताना फॉर्मात असलेल्या हेनरिच क्लासेन आणि हॅरी ब्रूकचा यॉर्करवर त्रिफळा उडवला.

5 / 8

रुरकी येथील धांडेरा येथील मढवाल हा रिषभ पंतचा शेजारी आहे आणि त्याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. आकाशचे घर रिषभच्या समोर आहे. ते शेजारी आहेत. २०१३ मध्ये झालेल्या एका दुर्घटनेत मढवाल याने भारतीय सैन्यात असलेले वडील गमावले.

6 / 8

मढवाल त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होता, तो इंजिनीअरिंग करत होता आणि फक्त छंद म्हणून क्रिकेट खेळत होता. उत्तराखंड रणजी ट्रॉफीमध्ये खेळत नसल्याने त्याचे मुख्य लक्ष टेनिस बॉल क्रिकेटवर होते. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याचा दबदबा होता.

7 / 8

“२०१९ मध्ये निवड चाचण्यांसाठी तो आला, तेव्हा आम्ही सर्वजण खूप प्रभावित झालो. तो चपळ आणि वेगवान आहे. वसीम भाईने त्याला ताबडतोब संधी दिली आणि सय्यद मुश्ताक अलीला कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात मैदानावर उतरवले. पण, त्याची तयारी कमी झालेली दिसली. पुढच्या वर्षी, कोविडच्या काळात, जेव्हा रणजी ट्रॉफी रद्द झाली आणि मी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा मी त्याला सांगितले की तो तिन्ही फॉरमॅट खेळेल,” असे उत्तराखंडचे मुख्य प्रशिक्षक झा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले .

8 / 8

आकाशने मानले रोहित शर्माचे आभार... तो म्हणाला, रोहित भैयाचे आभार.. त्याने मैदानावर मला खूपच सहकार्य केले आणि मला ही संधी दिली.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सउत्तराखंड
Open in App