RCB च्या संघावर ज्याने १६ हजार कोटींहून अधिक बोली लावली तो कधीकाळी खेळाडूच्या रुपात IPL फ्रँचायझींचा भाग होता.
२०१८ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाने फक्त ३० लाख रुपयांच्या बोलीसह ज्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते तो क्रिकेटर आज ८ वर्षांनी एक बिझनेस टायकूनच्या रुपात RCB चा नवा बॉस झाला आहे.
इथं जाणून घेऊयात कोण आहे RCB चा नवा अध्यक्ष आर्यमन विक्रम बिर्ला? कसा राहिला आहे या चेहऱ्याचा क्रिकेटर ते टी-२० क्रिकेटमधील सर्वात महागड्या फ्रँचायझीचा सहमालक इथपर्यंतचा प्रवास यासंदर्भातील खास गोष्ट
आर्यमन विक्रम बिर्ला हा आदित्य बिर्ला समुहाचे प्रमुख मंगल कुमार बिर्लाडा यांचा मुलगा आहे. सध्याच्या घडीला तो फक्त २८ वर्षांचा असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मध्य प्रदेशच्या संघाकडून खेळला आहे.
Who is Aryaman Birla RCB New Chairman : आयपीएल २०२६ च्या हंगामाला सुरुवात होण्याआधी गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला नवा मालक मिळाला आहे.
आर्यमन विक्रम बिर्ला हा आदित्य बिर्ला समुहाचे प्रमुख मंगल कुमार बिर्लाडा यांचा मुलगा आहे. सध्याच्या घडीला तो फक्त २८ वर्षांचा असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मध्य प्रदेशच्या संघाकडून खेळला आहे.
आर्यमन बिर्ला याने आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर यांच्यासोबत ड्रेसिंग रुम शेअर केली आहे.
डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या आर्यमन याने ९ प्रथमश्रणी सामन्यात मध्यप्रदेश संघाचे नेतृत्व करताना एका शतकाच्या मदतीने ४१४ धावा केल्या आहेत. याशिवा ४ लिस्ट-ए सामन्यात त्याच्या खात्यात ३६ धावांची नोंद आहे.
आयपीएल २०१८ च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सच्या संघाने ३० रुपयांत या क्रिकेटरला आपल्या संघात सामील करुन घेतले. २०२० च्या हंगामापर्यंत तो RR चा भागरा हिला. पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
IPL मध्य फक्त ३० लाखांची बोलू लागून बाकावर बसण्याची वेळ आलेल्या क्रिकेटर आता IPL मधीलच नव्हे तर टी-२० क्रिकेटमधील सर्वात महागडा फ्रँचायझी संघ असलेल्या RCB चा सह मालक आणि चेअरमन झाला आहे.