श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने भारताविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. संगकाराने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताविरुद्ध ११ शतके आणि २३ अर्धशतके झळकावली आहेत.
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्सचे भारताविरुद्ध रेकॉर्ड चांगले आहे. त्याने भारताविरुद्ध ४९.५५ च्या सरासरीने २ हजार ९२४ धावा केल्या आहेत, ज्यात ११ शतकांचा समावेश आहे.
इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने आतापर्यंत भारताविरुद्ध १४ शतके ठोकली आहेत. भारताविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत जो रूटच्या बॅटमधून आणखी ३ शतके झळकली तर, तो विश्वविक्रमाला गवसणी घालू शकतो.
रिकी पॉन्टिंगने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेट भारताविरुद्ध एकूण १४ शतके झळकावली आहेत. त्याने ८९ सामन्यांच्या १११ डावात ४ हजार ७९५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
स्टीव्ह स्मिथ हा भारताविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे. स्मिथने भारताविरुद्ध ६५ सामन्यांच्या ८३ डावात १३ अर्धशतके आणि १६ शतके झळकावली आहेत.