Join us

Who is Deepak Chahar Fiancee?: ती फॉरेनर नाही, दिल्लीतील मुलगी आहे!; दीपक चहरच्या बहिणीनं सांगितलं वहिनीचं नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 00:47 IST

Open in App
1 / 8

चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि पंजाब किंग्स ( PBSK) यांच्यातल्या सामन्यात पंजाबनं ६ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतर दीपक चहरच्या ( Deepak Chahar) प्रेमाच्या डावाचीच जास्त चर्चा रंगली. सामन्यानंतर चेन्नईच्या गोलदाजानं स्टँडमध्ये गुडघ्यावर बसून एका मुलीला प्रपोज केलं. याच मुलीला आयपीएल आयोजकांनी VIP गेस्ट असल्याचे त्यांच्या वेबसाईटवर सांगितले होते आणि सामन्यानंतर ती चहरची गर्लफ्रेंड असल्याचे स्पष्ट झाले.

2 / 8

सामना संपल्यानंतर दीपक स्टँडमध्ये उभ्या असलेल्या त्या मुलीजवळ गेला. महेंद्रसिंग धोनीची मुलगी जिवाही तेथे उपस्थित होती. त्या मुलीला काही समजायच्या आधी दीपक तिच्यासमोर जाऊन गुडघ्यावर बसला. त्यानंतर खिशातून अंगठी काढून तिला लग्नाची मागणी घातली. हे सर्व पाहून ती मुलगी आनंदी झाली आणि लगेच होकार दिला.

3 / 8

दीपकनं मग दुसरी अंगठी काढून तिला त्याच्या बोटात घालायला सांगितली. पण, ही मुलगी कोण आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दीपकचे नाव 'बिग बॉस' फेम सिद्धार्थ भारद्वाज (Sidharth Bharadwaj) याची बहीण जया भारद्वाज हिच्याशी जोडले गेले होते आणि ही तिच मुलगी आहे असा दावा केला जात आहे.

4 / 8

दीपक व जयाच्या या प्रेमाचं सेलिब्रेशन चेन्नई सुपर किंग्सच्या हॉटेलमध्येही झालं.. या दोघांनी केक कापून एकमेकांना तो भरवला आणि यावेळी CSKचे सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ व हॉटेल स्टाफ उपस्थित होते.

5 / 8

ही परदेशी मुलगी असल्याच्याही चर्चा रंगल्या. पण, दीपकची बहिण मालती हिनं ती मुलगी कोण हे स्पष्ट केले. तिनं इंस्टाग्रामवर लिहिलं की, माझा भाऊ दुसऱ्या कुणाचातरी झाला... चला मला वहिनी मिळाली... ही जया भारद्वाज आहे आणि ती परदेशी मुलगी नाही. दिल्लीतील मुलगी आहे.

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्स
Open in App