पहिल्या वनडेला पावसाचा फटका बसला. पण पाऊस असतानाही भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनी या सामन्यादरम्यान भन्नाट डान्स केला.
पावसामुळे मैदान निसरडे झाल्याने काही काळ खेळ थांबवला होता. त्यावेळी मैदानात गाणी लावली होती. या गाण्यावर कोहली आणि गेल थिरकताना पाहायला मिळाले.
कोहलीने तर या गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला.
कोहली संघातील केदार जाधवबरोबर गाण्यांवर ठेका धरताना दिसत होता.
कोहलीने यावेळी प्रेक्षकांच्या दिशेने हावभाव करत चांगलाच डान्स केला.
कोहलीच्या डान्सचा यावेळी भारतीय खेळाडूंनीही आनंद लुटला.