विराट आणि अनुष्का हे एका जाहिरातीदरम्यान २०१३ साली भेटले होते.
त्यानंतर हे दोघेही डेटिंगवर जायॉला लागले. पण या दोघांनी आपल्या नात्याची वाच्यता कुठेही केली नव्हती.
२०१४ साली विराटला सपोर्ट करायला अनुष्का थेट न्यूझीलंडला गेली होती.
यावेळी दोघांचे न्यूझीलंडमध्ये खेळतानाचे फोटो वायरल झाले होते.
त्यानंतर कोहलीने हैदराबाद येथील एका सामन्यात शतक झळकावल्यावर सामना पाहायला आलेल्या अनुष्का फ्लाइंग किस दिला होता.
त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या.अनुष्का ही कोहलीसाठी अनलकी आहे, असे चाहते म्हणू लागले होते.
कारण अनुष्का जेव्हा सामना पाहायला जायची तेव्हा कोहलीची चांगली कामगिरी व्हायची नाही. पण कोहली नेहमीच अनुष्काला पाठिंबा देत होता.
कोहलीने जेव्हा २०१६ साली अनुष्काला ट्विटरवर अनफॉलो केलं होतं. त्यावेळी त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला होता, असे म्हटले गेले होते.
पण त्यानंतर या दोघांनी इटलीमध्ये जाऊन लग्न केले.