Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र सेहवागच्या प्रश्नांवर Sunny Leoneची जोरदार फटकेबाजी; दोघांनी केलेली एकत्रित कॉमेंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:33 IST

Open in App
1 / 10

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी आज तिचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडच्या अऩेक चित्रपटांत तिनं काम केलंय, शिवाय काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केलं आहे. पण, तिनं क्रिकेट सामन्यात कॉमेंट्री केली, हे बहुतेकांना माहितही नाही.

2 / 10

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 10व्या मोसमात बेबी डॉलनं भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागसोबत कॉमेंट्री केली होती. UC news साठीच्या 'मसाला कॉमेंट्री'त या दोघांनी सहभाग घेतला होता.

3 / 10

या कार्यक्रमात सेहवागनं तिला क्रिकेट संबंधीत अनेक प्रश्न विचारले आणि सनी लिओनीनं उत्तर देत जोरदार फटकेबाजीही केली होती.

4 / 10

सनी लिओनीनं यावेळी सेहवागला काही रॅपीड फायर प्रश्न विचारले होते. बघुया या दोघांमधील प्रश्न-उत्तर...

5 / 10

वीरेंद्र सेहवाग - इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) च्या 10व्या मोसमात कोण बाजी मारेल? ; सनी लिओनी - मी आज सनरायझर्स हैदराबाद संघाला पाठींबा देत आहे, परंतु मला शाहरूख खान आवडतो आणि यंदाची आयपीएल कोलकाता नाइट रायडर्स जिंकेल.

6 / 10

सनी लिओनी - खेळाडू ग्लोज का नाही घालत?; वीरेंद्र सेहवाग - चांगला प्रश्न आहे... सर्व मलाच सांगावं लागत आहे. आता तुम्ही मला सांगा की अभिनेते कॅमेराच्या मागे का नसतात?

7 / 10

सनी लिओनी - तुमचा आवडता खेळाडू कोण, सेहवाग पाजी?; वीरेंद्र सेहवाग - डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलमधील माझा आवडता खेळाडू आहे.

8 / 10

सनी लिओनी - तुझ्या क्रिकेट कारकिर्दीत आवडता सलामीचा जोडीदार? ; वीरेंद्र सेहवाग - गौतम गंभीर.

9 / 10

सनी लिओनी - टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हायला तुला आवडेल का?; वीरेंद्र सेहवाग - नाही, BCCIला माझी फी देणं परवडणारं नाही. हाहा.

10 / 10

या कार्यक्रमानंतर वीरूच्या गोलंदाजीवर सनी लिओनीनं फटकेबाजी केली होती.

टॅग्स :सनी लिओनीविरेंद्र सेहवागआयपीएल 2018