Join us  

महेंद्रसिंग धोनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला असता; पण, न खेळण्यास कारण ठरला सचिन तेंडुलकर

By स्वदेश घाणेकर | Published: February 16, 2021 12:01 PM

Open in App
1 / 9

सप्टेंबर २००७ टीम इंडियानं महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2008) लिलावासाठी चुरस रंगली.

2 / 9

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) ६ कोटींमध्ये महेंद्रसिंग धोनीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. आता आयपीएलमध्ये सर्वाधिक १५० कोटींची पगार घेणारा धोनी हा पहिलाच खेळाडू आहे.

3 / 9

आयपीएलच्या पहिल्या लिलावात धोनीला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सर्वच फ्रँचायझींमध्ये चुरस रंगली असेल, यात काही शंका नाही. मुंबई इंडियन्सही ( Mumbai Indians) धोनीला त्यांच्या ताफ्यात घेण्यासाठी सज्ज होते आणि त्यासाठी त्यांची पैसा ओतण्याची तयारीही होती.

4 / 9

महेंद्रसिंग धोनीसाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोघांमध्ये चुरस रंगली आणि दोन्ही फ्रँचायझी ९ डॉलरपर्यंत आले आणि मुंबई इंडियन्सनं माघार घेतली.

5 / 9

मुंबई इंडियन्सच्या माघार घेण्यामागे सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) कारण ठरला.... मुंबई इंडियन्सनं सचिनला आयकॉन म्हणून निवडले होते. नियमानुसार फ्रँचायझीतील सर्वाधिक पगार असलेल्या खेळाडूपेक्षा आयकॉन खेळाडूचा पगार हा १५ टक्के अधिक असायला हवा.

6 / 9

त्यामुळे धोनीसाठी अधिक रक्कम मोजले असते तर त्याचा पगार हा तेंडुलकरपेक्षा अधिक झाला असता अन् मुंबई इंडियन्सच्या खात्यात ५ मिलियन डॉलरच शिल्लक होते.

7 / 9

त्यामुळे सचिन तेंडुलकरला रक्कम दिल्यानंतर ते धोनीला घेऊ शकत नव्हते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सनं धोनीला आपल्या ताफ्यात घेतले.

8 / 9

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं तीन जेतेपद उंचावली आहेत. तसंच चेन्नईनं १९७ पैकी ११९ सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये १०० विजय मिळवणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

9 / 9

सचिन तेंडुलकरनं २००८-२०११ या कालावधीत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सांभाळले. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईनं २०१० मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु धोनीच्या संघानं त्यांना पराभूत केले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकरआयपीएलमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स