Join us  

‘तुझ्यामुळे आम्ही हरलो, पुन्हा ती चूक केलीस तर बॅटने मारेन’ सचिनने दिली होती धमकी, वीरूने सांगितला तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 1:17 PM

Open in App
1 / 8

भारताचा एकेकाळचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या मनमोकळ्या स्वभावासाठीही ओळखला जातो. दरम्यान, वीरेंद्र सेहवागने खेळपट्टीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतचा तो किस्सा सांगितला आहे जेव्हा सचिनने त्याला बॅटने मारण्याची धमकी दिली होता.

2 / 8

वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके फटकावली होती. तर त्याचं तिसरं त्रिशतक केवळ ७ धावांनी हुकलं होतं. अन्यथा अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला असता.

3 / 8

वीरेंद्र सेहवागने एका मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच सचिनने त्याला बॅटने मारण्याची धमकी दिली होती, असं सांगितलं आहे. ही घटना २००४ मधील पाकिस्तानच्या दौऱ्यातील आहे. तेव्हा वीरेंद्र सेहवागने मुल्तान कसोटीत त्रिशतकी खेळी केली होती.

4 / 8

वीरेंद्र सेहवागने सांगितलं की, मुल्तानमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत मी १०० धावांपर्यंत चार षटकार ठोकले होते. त्यानंतर सचिन माझ्याजवळ आला आणि बजावलं की, आता षटकार मारण्याचा प्रयत्न करू नको, तू आता मोठी खेळी करू शकतोस, याआधी तुझ्या षटकार मारण्यामुळे आम्हाला ऑस्ट्रेलियात पराभूत व्हावं लागलं होतं.

5 / 8

वीरेंद्र सेहवागने आपल्या डावात १३० धावां होईपर्यंत पाच षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याने सहावा षटकार ठोकून त्रिशतक पूर्ण केलं होतं. म्हणजेच सचिन तेंडुलकरने सल्ला दिल्यानंतर त्यानं धैर्याने फलंदाजी केली होती. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील मेलबर्न कसोटीत वीरेंद्र सेहवागने १९५ धावांची खेळी केली होती.

6 / 8

तेव्हा सेहवाग सायमन कॅटिचला सीमापार भिरकावण्याच्या नादात बाद झाला होता. त्यामुळे त्याचं द्विशतक हुकलं होतं. तसेच तो बाद झाल्यानंतर भारताचा डावही गडगडला होता. ३ बाद ३११ वरून भारताचा डाव ३६६ धावांत आटोपला होता. अखेर ऑस्ट्रेलियाने हा सामना ९ विकेट्सनी जिंकला होता.

7 / 8

वीरूने सांगितलं की, जेव्हा मी ३०० धावांपर्यंत पोहोचलो होते. तेव्हा माझ्यापेक्षा अधिक आनंदी सचिन झाला होता. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर डावाने विजय मिळवला होता.

8 / 8

मात्र याच सामन्यात सचिन तेंडुलकर १९४ धावांवर असताना डाव घोषित करण्यात आल्याने त्या सामन्यात नेतृत्व करत असलेल्या राहुल द्रविडवर टीका झाली होती.

टॅग्स :विरेंद्र सेहवागसचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App