नुकताच दक्षिण अफ्रिकेचा दौरा यशस्वी करून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने फुटबॉलच्या सामन्याला हजेरी लावली.
गोव्यातील मडगावच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ‘तो’ येणार म्हणून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
त्याची एक झलक टिपण्यासाठी मैदानावर मोठी गर्दी केली होती. त्याच्या ‘विराट’ दर्शनाने फुटबॉलच्या मैदानावर क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळाला.
जवळपास दोन वर्षांनतर तो फुटबॉलच्या सामन्यासाठी गोव्यात आला. विराट हा एफसी गोवा संघाचा सहमालक आहे.