भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर असलेला ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेतील विश्वविक्रम पाकिस्तानच्या बाबर आझमने मोडला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात बाबरने वैयक्तिक १००० धावाही पूर्ण केल्या. बाबरने २६ डावांत १००० धावांचा पल्ला ओलांडला. या कामगिरीसह त्याने कोहलीच्या नावावर असलेला विक्रम स्वत:च्या नावावर केला. कोहलीने सर्वात जलद म्हणजे २७ डावांत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा केल्या होत्या. या विक्रमातील टॉप टेन खेळाडू...
बाबर आझम ( पाकिस्तान) 26 डाव
विराट कोहली ( भारत) 27 डाव
अॅरोन फिंच ( ऑस्ट्रेलिया) 29 डाव
केव्हीन पीटरसन ( इंग्लंड) 32 डाव
अॅलेक्स हेल्स ( इंग्लंड) 32 डाव
फॅफ ड्यू प्लेसिस ( दक्षिण आफ्रिका) 32 डाव
ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज) 34 डाव
केन विल्यम्सन ( न्यूझीलंड) 34 डाव
कुशल परेरा ( श्रीलंका) 34 डाव
ब्रेंडन मॅकलम ( न्यूझीलंड) 35 डाव