IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या ताफ्यातून खेळणाऱ्या इंग्लिश ऑलराउंडरनं लग्न उरकल्याची गोष्ट शेअर केली आहे.
क्रिकेटर लियाम लिविंगस्टोन याने कॅटी ओलिविया मॉफेट हिच्यासोबत लग्न बंधनात अडकला आहे. दोघांनी आपापल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आयुष्यातील खास क्षण फोटोच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केलाय.
लियानं खास कॅप्शनसह आपल्या लग्नाची खास गोष्ट सांगितलीये. त्याने लिहिलंय की, कायदेशीररित्या आम्ही आमचे नाते अधिकृत केले. अगदी जवळच्या मंडळींच्या साक्षीनं लग्न सोहळा पार पडला. आता पुढच्या वर्षी जंगी सेलिब्रेशन पार्टीसाठी काउंट डाउन सुरु केले आहे. लग्नानंतर पार्टी झाली नसली तरी वर्षभरानंतर धमाका करणार आहे, ही गोष्टच क्रिकेटनं सांगून टाकलीये.
ओलिविया ही फॅशन क्वीन आहे. अनेकदा ती आपल्या स्टायलिश अंदाजाने लक्षवेधून घेताना दिसते. ती सौंदर्य, परफेक्ट फिगर अन् फिटनेसच्या जोरावर हॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.
जोडी जमली, लग्न उरकल, मग सेलिब्रेशनचा मुहूर्त वर्षांनी का? असा प्रश्न चाहत्यांना पडू शकतो. जोडी आणखी काही सरप्राइज देण्याचा प्लॅन करतीये का? ते येणारा काळच सांगू शकेल.
लग्नाच्या अल्बममधील रोमँटिक फोटो दोघांच्यातील प्रेमाचा गोडवा किती खास आहे ते दाखवून देणारा आहे.