दिल्लीच्या माँदाम तुसाँ म्युझियममध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे.
- बुधवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. विराट कोहली त्याच्या 18 नंबरच्या जर्सीमध्ये पाहायला मिळतो आहे.
विराटचा हा पुतळा तयार करण्यासाठी सहा महिन्याचा वेळ लागला असून वीस कलाकारांनी त्यासाठी काम केलं आहे.
विराटने स्वतःही त्याच्या या पुतळ्याचं कौतुक केलं आहे.