भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं जोरदार ख्रिसमस सेलिब्रेशन केलं.
त्यानं कोलकाता येथील गोरगरीब मुलांसाठी सांताचं रूप धारण केलं आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं.
स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात कोलकाता येथील अनाथ आश्रमात विराट सांता बनून गेला.
या आश्रमातील मुलांनी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अन्य काही महान खेळाडूंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कोहलीनं त्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि सांता बनून त्यानं मुलांना गिफ्ट दिले.
कोहलीचं हे प्रेम पाहून मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली.
भारतीय संघ रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा वन डे सामना खेळणार आहे.