आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील आरसीबीचे कर्णधार अन् त्यांचा कॅप्टन्सीचा रेकॉर्ड

७ कॅप्टन १७ हंगाम... अजूनही पाटी कोरीच!

आयपीएलच्या अठराव्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं नव्या कॅप्टनची घोषणा केलीये.

आरसीबीच्या संघानं रजत पाटीदार याच्याकडे नेतृत्वाची कमान सोपवली आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील या संघाचा आठवा कर्णधार आहे.

इथं एक नजर टाकुयात आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधार अन् त्यांचा रेकॉर्ड

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने १४३ सामन्यातील ६६ सामने जिंकले आहेत. RCB चा यशस्वी कॅप्टन असला तरी त्यालाही संघाला ट्रॉफी जिंकून देता आलेली नाही.

भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यानेही या संघाचे नेतृत्व केले आहे. ३५ सामन्यात त्याने संघाला १९ विजय मिळवून दिले आहेत.

फाफ ड्युप्लेसिसच्या कॅप्टन्सीत RCB नं ४२ पैकी २१ सामन्यात विजय मिळवला आहे.

आयपीएलच्या पहिल्या हंगामात राहुल द्रविड RCB संघाचा कॅप्टन होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघानं १४ सामन्यात ४ विजय आणि १० सामन्यात पराभवाचा सामना केला आहे.

केविन पीटरसन याने ६ सामन्यात आरसीबीचं नेतृत्व केले त्यातील २ सामन्यात विजय तर ४ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

डॅनिएल व्हिक्टोरी देखील या संघाचे नेतृत्व करताना दिसले आहे. २८ सामन्यात १५ विजय आणि १३ पराभव असा रेकॉर्ड या किवी स्टारच्या नावे आहे.

शेन वॉटसन याने ३ सामन्यात या संघाचे नेतृत्व केले असून यातील एका सामन्यात विजय तर दोन सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.