Join us
Daily Top 2Weekly Top 5

सागर किनारी विराट झाला शर्टलेस, तर अनुष्काने बिकिनीमध्ये केलं फोटो शूट, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 11:24 IST

Open in App
1 / 7

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतून अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे. विराट या विश्रांतीचा फायदा घेऊन कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. त्याने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

2 / 7

विराट कोहलीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपला एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली समुद्र किनारी वाळूत शर्टलेस होऊन बसलेला दिसत आहे.

3 / 7

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिनेची आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा ऑरेंज कलरच्या बिकीनीमध्ये दिसत आहे.

4 / 7

अनुष्का शर्मा हिने इन्स्टाग्रावर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एका फोटोमध्ये कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती कॅमेऱ्यापासून थोडी दूर दिसत आहे.

5 / 7

अनुष्का शर्मा सध्या महिला क्रिकेट संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारीत चकदा एक्स्प्रेस या चित्रपटाचं चित्रिकरण करत आहे. त्यातून वेळ काढत ती विराटसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे.

6 / 7

विराट कोहलीला आयपीएल आटोपल्यानंतर २० दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. विराट कोहली इंग्लंड दौऱ्यामध्ये खेळणार आहे. भारतीय संघ १५ किंवा १६ जूनला इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. तिथे भारतीय संघ एक कसोटी आणि मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे.

7 / 7

विराट कोहलीची आयपीएल २०२ मध्ये सुमार कामगिरी झाली होती. तसेच २०१९ नंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक फटकावता आलेलं नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये तो तीनवेळा गोल्डन डकवर बाद झाला होता.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मासेलिब्रिटी
Open in App