Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तयार, पण एका अटीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 16:43 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. सध्याच्या युगातील सर्वोत्तम फलंदाजांत विराट अव्वल स्थानावर आहे. त्यानं आपल्या कामगिरीतून ते सिद्धही केलं आहे. त्याच्या नावावर 70 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत.

2 / 8

पण, क्रिकेटनंतर आता विराट अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकण्यास सज्ज होत आहे आणि त्यानं स्वतःच्या बायोपिकमध्ये मूख्य भूमिका करणार असल्याचे रविवारी जाहीर केले.

3 / 8

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्याशी इंस्टाग्राम लाईव्ह चॅट करताना विराटनं हा खुलासा केला. विराट आणि छेत्री यांनी यावेळी त्यांच्या कारकिर्दीसह क्रिकेट, फुटबॉल, लहानपणीच्या आठवणी आणि बऱ्याच गोष्टींवर गप्पा मारल्या.

4 / 8

त्यावेळी छेत्रीनं त्याला विचारले की, तुला स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल का? त्यावर विराटनं त्वरित हो उत्तर दिलं. पण, त्यानं को-स्टार म्हणून अनुष्का शर्मा असेल, तरच काम करीन असं सांगितलं.

5 / 8

भविष्यात तुझ्यावर बायोपिक बनवण्यात आला आणि त्यात तुझ्या पत्नीची भूमिका अनुष्का शर्मालाच देण्यात आली, तर तुला स्वतःची भूमिका करायला आवडेल का?

6 / 8

छेत्रीच्या या प्रश्नावर विराट म्हणाला,''अनुष्कासोबत नक्कीच मला बायोपिकमध्ये स्वतःची भूमिका करायला आवडेल. मी अभिनय करू शकतो. मी फुटबॉलही करू शकतो, तर तू मला इंडियन सुपर लीगमध्ये खेळायला देशील का?''

7 / 8

तो पुढे म्हणाला,''बायोपिकमध्ये मी स्वतःची भूमिका चांगली वठवू शकतो. जर माझ्यापेक्षा चांगली भूमिका कोण करत असेल, तर मी बिनकामाचा माणूस असेन.''

8 / 8

विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहीरातीच्या शूट दरम्यानच झाली होती. 11 डिसेंबर 2017मध्ये या दोघांनी विवाह केला.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मासुनील छेत्री