Retirement: विराट कोहली, रोहित शर्मा आणि...; २०२५ मध्ये निवृत्त झालेल्या दिग्गज क्रिकेटपटुंची यादी

Cricketers Retires in 2025: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक मोठ्या क्रिकेटपटूंनी यावर्षी निवृत्ती जाहीर केली.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आज कसोटी क्रिकेटमधून निवत्ती जाहीर केली.

न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

बांगलादेशचा तमीम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्ती जाहीर केली.

ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर मार्कस स्टॉयनिसने यावर्षी एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला.

श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीला पूर्णविराम लावला.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही याच वर्षी एकदिवसीय क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला.

बांगलादेशचा मुशफिकुर रहीम एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

बांगलादेशचा महमुदुल्लाह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्मा नुकताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.