सचिनने विश्वचषकात 241 चौकार लगावले आहेत, हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
सचिनच्या नावावर विश्वचषकात 2278 धावा आहेत, हा विक्रमही अजून कुणी मोडू शकलेला नाही.
सचिनने विश्वचषकात 50पेक्षा जास्त धावा 21 वेळा केल्या आहेत. यामध्ये सहा शतकांसह 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
सचिन विश्वचषकात 44 इनिंग्ज खेळला आहे. यानंतर रिकी पॉन्टिंग (42 इनिंग्ज) दुसरा क्रमांकावर आहे.