Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup: सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द मॅच' जिंकणारे टॉप ५ खेळाडू; निवृत्तीनंतरही कोहलीचा दबदबा कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 20:32 IST

Open in App
1 / 5

विराट कोहलीने ३५ टी-२० विश्वचषक सामने खेळताना तब्बल ८ वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला. त्याने ३३ डावांत १२९२ धावा केल्या. २०२४ मध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

2 / 5

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. झम्पाने २५ सामन्यांत ५ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. ओमानविरुद्ध ३.२ षटकांत १३ धावा देत ४ बळी घेत त्याने हा मान पटकावला.

3 / 5

श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने त्याच्या टी-२० कारकिर्दीत पाच वेळा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे, त्याने या फॉरमॅटमध्ये ३१ सामने खेळले आहेत. महेला यांनी ३१ डावांमध्ये १०१६ धावा केल्या आहेत.

4 / 5

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने ३३ टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये पाच वेळा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे. वेस्ट इंडिजच्या सर्वात शक्तिशाली आणि स्फोटक फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने ३१ डावांमध्ये ९६५ धावा केल्या आहेत. गेलने या स्पर्धेत १० विकेट्सही घेतल्या आहेत.

5 / 5

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन यानेही २४ सामन्यांत ५ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. त्याने २२ डावांत ५३७ धावा आणि २२ विकेट्स घेत टी-२० विश्वचषकात अष्टपैलू कामगिरीची छाप पाडली आहे.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६विराट कोहलीऑफ द फिल्ड