दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे.
विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली एकाच वर्षात भारतीय संघाला या तिन्ही देशांमध्ये विजय मिळाले आहेत.
विराट कोहली आता गांगुली आणि धोनीला वरचढ ठरला आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे.
शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात केली.
आतापर्यंत भारताने 11 वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. पण यापूर्वी एकाही दौऱ्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना जिंकता आला नव्हता.
गेल्या 71 वर्षांमध्ये भारताने पहिल्यांदाच पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.