Join us

अनुष्काआधी विराट कोहलीचं परदेशी अभिनेत्रीसोबत होतं अफेअर; दोन वर्ष होते रिलेशनशीपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 15:37 IST

Open in App
1 / 7

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा यशाची शिखरं गाठत होता. तेव्हा अनेक मुलींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. २०१५ पूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर विराट आणि अनुष्का एकमेकांजवळ आले. पुढे त्यांच्या नात्याचं लग्नबंधनात रुपांतर झालं.

2 / 7

अनुष्का शर्मासोबतच्या रिलेशनशीपआधी विराट कोहली एका परदेशी अभिनेत्री आणि मॉडेलसोबत रिलेशनशीपमध्ये होता. 2012 ते 2014 या दोन वर्षात कोहलीचं नाव एका ब्राजीलियन मॉडल आणि अभिनेत्रीसोबत जोडलं जात होतं.

3 / 7

या अभिनेत्री आणि मॉडेलचं नाव इजाबेल लेइट असं आहे. कोहली आणि इजाबेलच्या रिलेशीनशीपबाबत २०१३ मध्ये खुलासा झाला. दोघं अनेकदा एकत्र देखील दिसले आहेत.

4 / 7

पुढे दोघांमध्ये २०१४ साली दुरावा निर्माण झाला. याबाबत कोहलीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पण इजाबेल हिनं मात्र कोहलीसोबतच्या रिलेशनशीपबाबतची कबुली दिली होती. दोघंही दोन वर्ष रिलेशनशीपमध्ये होते अशी माहिती इजाबेल हिनं दिलं होती.

5 / 7

दोघांनीही सहमतीनं रिलेशनशीप मध्येच थांबविण्याचा निर्णय घेतला होता. पण दोघंही अजूनही चांगले मित्र असल्याचं सांगितलं जातं. इजाबेल हिचं नाव अभिनेता सिद्धार्थ म्हलोत्रासोबत जोडलं गेलं होतं.

6 / 7

इजाबेल मॉडलिंग आणि अभिनयात नशीब आजमवण्यासाठी ब्राझीलहून भारतात आली होती. ती मूळची ब्राझीलच्या रोजिरियो शहरातील असून २०१२ साली 'तलाश' चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अभिनेता आमिर खान, करीना कपूर, रानी मुखर्जी हे प्रमुख भूमिकेत होते.

7 / 7

इजाबेल हिनं याआधी सिस्कटीन, पुरानी जिन्स यांसारख्या हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे. याशिवाय तिनं नरेंद्र, मिस्टर मजनू आणि वर्ल्ड फेमस लव्हर यांसारख्या तेलुगू चित्रपटात देखील काम केलं आहे.

टॅग्स :विराट कोहलीविराट अनुष्का लग्न