Join us  

Shoaib Akhtar on Virat Kohli: "७० शतकं ठोकणं म्हणजे 'कँडी क्रश' खेळण्याइतकं सोपं नाही"; शोएब अख्तर विराट कोहलीच्या टीकाकारांवर संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 8:33 PM

Open in App
1 / 7

Shoaib Akhtar on Virat Kohli: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट खेळाडू गेल्या काही दिवसांपासून टीकेचा धनी झाला आहे. गेल्या तीन वर्षांत विराटला एकही शतक ठोकता न आल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे.

2 / 7

विराट कोहली हा रन मशिन या नावाने प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी वेळेत ७० आंतरराष्ट्रीय शतकं ठोकण्याचा पराक्रम विराटने करून दाखवला आहे. पण गेल्या काही काळात त्याची बॅट शांत आहे.

3 / 7

विराटचा खराब फॉर्म असाच राहिला तर टी२० वर्ल्ड कप मध्ये त्याला संघाबाहेर करून त्याच्या जागी युवा खेळाडूला संधी द्यावी अशी मागणी वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव यांनी केली आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. पण पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने आता विराटची पाठराखण केली आहे.

4 / 7

पाकिस्तानच्या खेळाडूने म्हटले आहे, 'केवळ महान खेळाडूच दमदार शतके ठोकण्यास सक्षम असतात. प्रत्येक सर्वसाधारण खेळाडूच्या नावावर ७० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम होत नाही. त्यासाठी खास प्रतिभा असावी लागते.'

5 / 7

'विराट कोहली सध्या फारच विचित्र परिस्थितीत अडकला आहे. पण काही गोष्टींवर तो नक्कीच काम करत असणार. आणि मला विश्वास आहे की जेव्हा विराट कोहली या कठीण टप्प्यातून बाहेर येईल त्यावेळी आपल्या सर्वांना एक वेगळाच विराट कोहली पाहायला मिळेल.'

6 / 7

'मी पाकिस्तानी असलो तरी मी विराट कोहलीलाच सपोर्ट करत राहणार कारण त्याने ७० आंतरराष्ट्रीय शतकं ठोकून दाखवली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी शतकं ठोकणं म्हणजे कँडी क्रश खेळण्याइतकं सोपं काम नाही', अशा शब्दांत पाकिस्तानच्या शोएब अख्तरने विराटवर टीका करणाऱ्यांना सुनावलं.

7 / 7

कपिल देव हे खूप सिनियर आहेत. मी त्यांचा नक्कीच आदर करतो. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. ते एक महान क्रिकेटपटू होते. त्यामुळे त्यांनी जे काही म्हटलं आहे ते बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण इतरांना मात्र विराटबद्दल बोलण्याचा अधिकार नाही', असेही अख्तर म्हणाला.

टॅग्स :विराट कोहलीशोएब अख्तरपाकिस्तानकपिल देव
Open in App