Join us  

आशियात अव्वल नंबर; कॅप्टन कोहलीला मिळाली आणखी एक 'गोड' बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 3:45 PM

Open in App
1 / 10

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवाती त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले. 2017 मध्ये विराट-अनुष्कानं इटलीत मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं.

2 / 10

त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याच्या चर्चा अनेकदा उठल्या. पण, आज दोघांनी अधिकृतपणे त्यांच्या घरी पाहूणा येणार असल्याचे जाहीर केले.

3 / 10

'आम्ही दोनाचे तीन झालोय,' असं दोघांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जानेवारी २०२१ मध्ये घरी पाळणा हलणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. विराटनं ही गोड बातमी दिल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव झाला.

4 / 10

दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे.

5 / 10

अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे. अनुष्काचं संपुर्ण कुटुंब विराट कोहलीला चांगल्या प्रकारे ओळखतं.

6 / 10

लग्नाच्या तीन वर्षांनंतर या जोडप्याच्या घरी पाळणा हलणार आहे. या गोड बातमीनंतर विराट कोहलीला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली.

7 / 10

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांमध्ये विराटनं आशियाई सेलिब्रेटींमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या 75 मिलियनहून अधिक झाली आहे.

8 / 10

त्यानंतर प्रियांका चोप्रा ( मिलियन) आणि दीपिका पादुकोन ( 52 मिलियन) यांचे इस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

9 / 10

जगभरातील सेलिब्रेटींमध्ये विराटचा 29वा क्रमांक येतो, तर खेळाडूंमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो ( 238 मिलियन), लिओनेल मेस्सी ( 164 मिलियन) आणि नेयमार ( 141 मिलियन) हे अव्वल तीन स्थानावर आहेत.

10 / 10

कोहलीनं नुकतंच एनबीए सुपरस्टार लेब्रोन जेम्स ( 69 मिलियन) याला मागे टाकले. मागील 15 दिवसांत इंस्टावर 3.1 मिलियन फॉलोअर्स वाढले. विराटचे फेसबुकवर 36.9 मिलियन, तर ट्विटरवर 37.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माइन्स्टाग्राम