Virat Kohli Anushka Sharma, IPL 2022: RCB चा माजी कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्मशी झगडत आहे. सध्याच्या घडीला विराटची फलंदाजी त्याच्यावर रूसल्यासारखीच वाटत आहे. चाहत्यांना प्रत्येक सामन्यात विराट कोहलीकडून खूप अपेक्षा आहेत. पण प्रत्येक वेळी चाहत्यांचा अपेक्षाभंगच होताना दिसतोय.
या कठीण काळात विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिची त्याला साथ लाभल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलीय.
विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर तो फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणार असे साऱ्यांनी गृहित धरलं होतं. त्यावेळी चाहत्यांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या. पण प्रत्यक्षात मात्र त्याऊलटच घडलं.
असं असलं तरीही अनुष्का ही कायम विराटसोबत त्याचा सपोर्ट करण्यासाठी सज्ज आहे. नुकतेच अनुष्काने विराटसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
मॅक्सवेल आणि विनी रमण यांच्या लग्नानंतरची एक पार्टी RCB कॅम्पमध्ये साजरी झाली. त्यावेळी अनुष्काने विराटसोबतचे फोटो शेअर केले.
अनुष्काच्या या फोटोंमधून ती विराटच्या कायम पाठीशी आहे असा जणू संदेशच तिने दिला. या आधीही वेळोवेळी विराटच्या वाईट कामगिरीमध्ये ती त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली आहे.