Join us

शुभमंगल! पाहा विराट-अनुष्काच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 22:04 IST

Open in App
1 / 4

गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर हे दोघं विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीच्या बोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये दोघांचं लग्न झालं.

2 / 4

विराट कोहली आणि अनुष्का यांनी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास, एकाच वेळी लग्नाचे फोटो शेअर करुन या गोड बातमीवर शिक्कामोर्तब केलं.

3 / 4

''आज आम्ही एकमेकांसोबत कायमस्वरूपी प्रेमबंधनात अडकण्याचं आश्वासन दिलंय....हे वृत्त तुमच्यासोबत शेअर करताना मनापासून खूप आनंद होतोय... हा दिवस कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांच्या शुभेच्छांनी आणखी खास होईल...आमच्या जीवन प्रवासातील महत्वाचा हिस्सा राहिल्याबद्दल सर्वांचे आभार'' असं ट्विट दोघांनी केलं आहे'

4 / 4

इटलीच्या बोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये दोघांचं लग्न झालं. हे हाॅटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीचं हाॅटेल म्हणूनही ओळखलं जातं. जगातल्या 20 महागड्या हाॅटेल्सपैकी ते एक आहे. नवी दिल्लीत 21 डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन होणार आहे तर मुंबईत 26 डिसेंबर रोजी दोघांच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन असणार आहे.

टॅग्स :विरूष्का वेडिंगविराट अनुष्का लग्नविराट कोहलीअनुष्का शर्मा