विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट 2013 साली झाली.
एका जाहिरातीच्या निमित्ताने ते एकत्र आले होते.
या जाहिरीतीच्यावेळी त्यांच्यामध्ये प्रेमाचा अकुंर फुलला आणि त्यानंतर तो बहरत गेला.
अनुष्का ही कोहलीसाठी लकी नसल्याचे बोलले गेले, पण विराटने तिची साथ सोडली नाही.
गेल्यावर्षी 11 डिसेंबरला या दोघांनी इटलीमध्ये लग्न केले.
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये विराट आणि अनुष्का लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.