IPL च्या नव्या हंगामाआधी वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियातील एन्ट्रीचा मार्ग मोकळा; जाणून घ्या सविस्तर

IPL च्या गत हंगामापासून प्रत्येक स्पर्धेत त्याने तुफान फटकेबाजीसह मैफील लुटली. त्यानंतर वैभव सूर्यंवशी टीम इंडियाकडून कधी मैदानात उतरणार? असा प्रश्न चर्चेत होता.

IPL च्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी भारताचा युवा स्फोटक सलामीवर वैभव सूर्यवंशीचा सिनिअर टीम इंडियात एन्ट्रीचा मोठा अडथळा दूर झाला आहे.

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. या युवा भारतीय फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध अवघ्या ८० चेंडूंमध्ये शानदार १७५ धावा ठोकल्या.

IPL च्या गत हंगामापासून प्रत्येक स्पर्धेत त्याने तुफान फटकेबाजीसह मैफील लुटली. त्यानंतर वैभव सूर्यंवशी टीम इंडियाकडून कधी मैदानात उतरणार? असा प्रश्न चर्चेत होता. आता त्याचा भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बिहारचा रहिवासी असलेला वैभव सूर्यवंशी IPL च्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी १५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला होता. यासह, तो आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी पात्र ठरला आहे.

बिहारचा रहिवासी असलेला वैभव सूर्यवंशी IPL च्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी १५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला होता. यासह, तो आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी पात्र ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणातील सर्वात मोठा अडथळा आयसीसीचे वय धोरण होते. २०२० मध्ये, आयसीसीने युवा खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एक नियम लागू केला. या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूचे वय किमान १५ वर्षे असणे अनिवार्य आहे.

राजस्थानकडून १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये धमाकेदार पदार्पण करणारा वैभव यंदा दुसऱ्या हंगामाची तयारी करत आहे. १५ बर्थडेनंतर तो लवकरच टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात दिसू शकतो.

वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात ७ सामने खेळून २५२ धावा केल्या होत्या. या हंगामात त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.

गुजरात टायटन्सविरुद्ध, वैभवने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले. तो आता आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्या खेळीत त्याने ३८ चेंडूंचा सामना करत १०१ धावा केल्या.

१८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ३ शतके आणि १ अर्धशतकासह २०४.३७ च्या स्ट्राईक रेटने ७०१ धावा केल्या आहेत. ८ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने १ शतक आणि १ अर्धशतकासह ३५३ धावा केल्या असून ८ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये १२ डावांत त्याने २०७ धावा केल्या आहेत.