Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : बिहारी खेळाडूंसाठी बहरदार हंगाम! वैभव सूर्यवंशीसह 'या' चौघांनी सोडली खास छाप

By सुशांत जाधव | Updated: April 15, 2026 18:43 IST

Open in App
1 / 7

बिहारचा लाल वैभव सूर्यवंशी हा गत हंगामापासून IPL मधील सर्वात चर्चित चेहरा आहे. यावेळी त्याने अगदी धमाकेदार अंदाजात सुरुवात केली आहे.

2 / 7

IPL च्या यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीसह बिहारचे एक दोन नव्हे तर चार खेळाडू लक्षवेधी कामगिरी करताना दिसत आहेत. इथं जाणून घेऊयात त्या खेळाडूंच्या खास कामगिरीवर एक नजर...

3 / 7

वैभव सूर्यवंशी हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्याील खेळाडू आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तो आंतरारष्ट्रीय स्तरावर धाक निर्माण करणाऱ्या गोलंदाजांना नडताना दिसतोय. या युवा प्रतिभावंत खेळाडूचं देशातीलच नव्हे तर परदेशातील दिग्गज क्रिकेटर्सही तोंडभरून कौतुक करताना दिसते.

4 / 7

आयपीएल २०२६ च्या स्पर्धात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून मुकेश कुमार हा आपल्या गोलंदाजीतील सर्वोत्तम क्षमता दाखवून देत आहे. बिहार येथील गोपालगंज येथील मुकेश कुमार IPL च्या मागील तीन हंगामापासून सातत्याने दमदार गोलंदाजी करत आहे. IPL मधील कामगिरीच्या जोरावरच त्याला टीम इंडियाकडून तिन्ही प्रकारात पदार्पणाची संधी मिळाली. यंदाही तो दिल्लीच्या ताफ्यातून दिमाखदार कामगिरी करतोय.

5 / 7

ईशान किशन यंदाच्या हंगामात सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व करत आहे. ईशान किशन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडकडून खेळत असला तरी बिहार क्रिकेटर्सबद्दल बोलले जाते त्यावेळी MS धोनी पाठोपाठ त्याचे नावही आघाडीवर असते. कारण बिहारची राजधानी पटना ही त्याची जन्मभूमी आहे.

6 / 7

IPL गाजवणाऱ्या बिहारी खेळाडूंच्या यादीत साकिब हुसेन याचीही वर्णी लागली आहे. या जलदगती गोलंदाजाने सनरायझर्स हैदराबाद संघाकडून पदार्पण करताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध ४ षटकात फक्त २४ धावा खर्च करत ४ विकट्सचा डाव साधला. तो पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणारा अनकॅप्ड गोलंदाजही ठरला.

7 / 7

ईशान किशनच्या नेतृत्वात धमाकेदार पदार्पण करणारा बिहारचा गोलंदाज आगामी हंगामात कशी कामगिरी करतोय? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :आयपीएल २०२६इंडियन प्रीमिअर लीगवैभव सूर्यवंशीइशान किशन