वैभव सूर्यवंशीला बक्षीस स्वरुपात मिळालेल्या अलिशान कारची किंमत किती? इथं पाहा खास फोटो

युवा क्रिकेटरला अलिशान कार मिळाली, पण ....

अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देणारा वैभव सूर्यवंशी सध्या खास कारणामुळे चर्चेत आहे.

क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक स्पर्धा गाजवणारा वैभव सूर्यवंशी सध्या बिहारमधील आपल्या गावी आहे. बिहारसह देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवणाऱ्या युवा क्रिकेटरवर बक्षीसांची बरसात करण्यात आली.

अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धा गाजवून घरी परतलेल्या वैभव सूर्यंवशीचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून खास सन्मान करण्यात आला.

पटना येथील कौतुक सोहळ्यात नितीश कुमार यांनी युवा क्रिकेटरला ५० लाख रुपयांचा धनादेश बक्षीस स्वरुपात दिला.

या फोटोमध्ये युवा क्रिकेटरसह त्याचे वडील संजीव सूर्यवंशी हे लेकाचं महागडे गिफ्ट स्विकारताना दिसून येते. त्यांच्यासोबत कुटुंबियातील अन्य सदस्यही दिसतात.

वैभव सूर्यवंशी याला टाटा मोटर्सकडून जी कार गिफ्ट स्वरुपात देण्यात आली आहे त्याची किंमत ९.६६ लाख ते १८.८५ लाख रुपयांच्या घरात आहे. तो महागड्या कारचा मालक झाला, पण आणखी तीन वर्षे त्याला ही कार चालवता येणार नाही.

भारतीय वाहन कायद्यानुसार, वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत वाहन परवाना मिळू शकत नाही. वैभव सूर्यवंशी सध्या १४ वर्षांचा असून पुढच्या महिन्यात २७ मार्चला वैभव १५ वा वाढदिवस साजरा करेल. कार चालवण्यासाठी १८ व्या वर्षांपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.

वैभव सूर्यवंशी याने यंदाच्या वर्षी CBSE बोर्डाची दहावीची परीक्षा देण्यासाठीही फॉर्म भरला होता. पण आगामी IPL च्या तयारीवर पूर्ण फोकस करण्यासाठी त्याने यंदाच्या वर्षी परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतला आहे. तो

IPL च्या पदार्पणातील वादळी शतकानंतर क्रिकेट जगतात हवा केल्यावर आता नव्या हंगामात तो आणखी धमाकेदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.