Join us  

Updated Indian team schedule till the T20 World Cup : टीम इंडिया आशिया चषकासह ३० सामने खेळणार; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत BCCI खेळाडूंना दमवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:07 PM

Open in App
1 / 7

Updated Indian team schedule till the T20 World Cup: सततच्या बायो बबलमुळे खेळाडू थकले असले तरी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळणार नाही. BCCI ने भारताच्या वेळापत्रकात आणखी तीन मालिका घुसवण्याच्या तयारीत आहेत.

2 / 7

भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. या दोन स्पर्धांच्या मध्ये बीसीसीआय आणखी तीन मालिका खेळवणार असल्याचे वृत्त TOI ने दिले आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत टीम इंडियाच्या खेळाडूंची दमछाक झालेली पाहायला मिळणार आहे.

3 / 7

श्रीलंकेविरुद्धची मालिका १६ मार्चला संपल्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएल २०२२साठी व्यग्र होतील, मे अखेरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. त्यानंतर १९ जूनपर्यंत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. आठवड्यातच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल.

4 / 7

इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय संघ एकाच वेळी कसोटी व ट्वेंटी-२० सामना खेळण्याची शक्यता आहे. हा ट्वेंटी-२० सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ लगेचच वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होईल आणि तेथून झिम्बाब्वे दौऱ्यावर जाईल. त्यानंतर आशिया चषक खेळण्यासाठी टीम इंडिया संयुक्त अरब अमिराती येथे दाखल होईल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

5 / 7

भारतीय संघ व्यवस्थापन आतापासूनच कामाला लागले आहेत आणि ते ३५ खेळाडूंचा चमू तयार करत आहेत. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सुरू असताना आयर्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० सामनाही खेळणे शक्य होणार आहे.

6 / 7

भारताचे वेळापत्रक - ३ ट्वेंटी-२० व २ कसोटी वि. श्रीलंका, आयपीएल २०२२, ५ ट्वेंटी-२० वि. दक्षिण आफ्रिका, १ ट्वेंटी-२० वि. आयर्लंड, ३ ट्वेंटी-२०, ३ वन डे, १ कसोटी वि. इंग्लंड, वेस्ट इंडिज दौरा, झिम्बाब्वे दौरा, आशिका चषक, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २ कसोटी वि. बांगलादेश आणि ४ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया

7 / 7

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध श्रीलंकाभारत विरुद्ध इंग्लंडआयसीसी विश्वचषक टी-२०
Open in App