१९वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये भारत आणि इंग्लंड आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात विजय मिळवून पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. मात्र भारताला हे यश मिळवण्यासाठी इंग्लंडच्या पाच खेळाडूंच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे. हे पाच खेळाडू पुढीलप्रमाणे
इंग्लंडच्या संघाचा कर्णधार टॉम प्रेस्ट भारतीय संघासाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकतो. १९वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये ७३ च्या सरासरीने २९२ धावा कुटल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात इंग्लंडच्या या फिरकीपटूने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. त्याने केवळ तीन सामन्यात १२ विकेट्स टिपल्या आहेत. अफगाणिस्तानच्याविरोधात उपांत्य फेरीत ४ विकेट्स घेऊन इंग्लंडला १५ धावांनी विजय मिळवून दिला होता.
१७ वर्षांचा हा खेळाडू इंग्लंडच्या वेगवान माऱ्याचे प्रमुख अस्र आहे. जोशुआने ५ सामन्यात त्याने १३ विकेट्स टिपल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक बळी टिपणाऱ्यांमध्ये तो चौथ्या स्थानी आहे. तर त्याच्या गोलंदाजीची सरासरी ही टॉप-१० गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे.
जेकब बेथल १९ वर्षांखालील विश्वचषकामध्ये इंग्लंडसाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा जमवल्या आहेत. त्याने ४०.६०च्या सरासरीने ५ सामन्यात २ अर्धशतकांसह २०३ धावा जमवल्या आहेत. बेथलने बॅटबरोबरच चेंडूनेही कमाल दाखवली आहे. त्याने पाच विकेट्स टिपल्या आहेत.
या फलंदाजाने ५ सामन्यात १७७ धावा जमवल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. या स्पर्धेत जॉर्ज थॉमसने ७ षटकार ठोकले आहेत.