भारतीय क्रिकेटपटू आणि स्टार मॉडल, अभिनेत्री यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा ऐकायला येतात. त्यात काही खऱ्या असतात, तर काही केवळ अफवा...
क्रिकेटपटूंचा महिला फॅन वर्गही मोठा असतो आणि त्यात विविध सेलिब्रेटी अन् मॉडलचाही समावेश असतो. त्यामुळे या चर्चा रंगतात...
अशीच एक टिव्ही स्टार आणि चित्रपत्रात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करणारी TikTok फेम मॉडलला भारतीय संघातील खेळाडूसोबत लग्न करायचे आहे. तशी इच्छा तिनं बोलूनही दाखवली आहे.
जन्नत जुबैर असं या मॉडलचं नाव असून TikTok वर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. विविध मालिकांमध्ये आणि चित्रपटांतही तिनं काम केलं आहे.
जन्नतचं नाव TikTok फेम फैजू याच्याशी जोडलं गेलं होतं, परंतु त्या सर्व अफवा होत्या. पण, एका मुलाखतीत तिला आवडत्या क्रिकेटपटूबद्दल विचारण्यात आले.
तिनं जराही वेळ न दवडता 22 वर्षीय रिषभ पंतचं नाव घेतलं आणि त्याच्यावर क्रश असल्याचं त्यानं सांगितलं. तिनं भारताच्या यष्टिरक्षकासह लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
पण, रिषभ पंतचे इशा नेगी हिच्यासोबत प्रेमसंबंध आहेत आणि याची दोघांनीही जाहीर कबुली दिलेली आहे.
रिषभ पंतचे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला हिच्यासोबतही नाव जोडलं गेलं होतं.