Join us  

Top 5 Performances, IPL 2022 MI vs RR: Mumbai indians च्या Tilak Varma पासून ते राजस्थानच्या Jos Buttler पर्यंत... 'या' ५ खेळाडूंनी चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन केलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 8:46 PM

Open in App
1 / 6

Top 5 Performances, IPL 2022 MI vs RR: Mumbai Indians विरूद्धच्या सामन्यात Rajasthan Royals संघाने २३ धावांनी विजय मिळवला. पाहूया या सामन्यात Top 5 खेळाडू ज्यांनी चाहत्यांचं केलं पुरेपूर मनोरंजन.

2 / 6

जोस बटलर (Jos Buttler) याने तुफानी फलंदाजी केली. त्याने ६८ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या साथीने १०० धावांची धुवांधार खेळी केली.

3 / 6

तिलक वर्मा (Tilak Varma) ने IPL करियरमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याने ३३ चेंडूत ३ चौकार ५ षटकारांसह ६१ धावा केल्या.

4 / 6

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आपल्या फिरकीची जादु पुन्हा एकदा चालवली. मुंबईच्या संघाने धावांचा वेग पकडला असताना युजीने दोन चेंडूत दोन बळी घेत सामना फिरवला. त्याला हॅटट्रिकची संधी होती, पण करूण नायरने स्लिपमध्ये तो झेल सोडला.

5 / 6

इशान किशन (Ishan Kishan) याने मोक्याच्या वेळी वेगवान फलंदाजी केली. त्याने ५ चौकार आणि एक षटकारासह ५४ धावा केल्या.

6 / 6

नवदीप सैनी (Navdeep Saini) ने अतिशय भेदक आणि तितकाच वेगवान मारा केला. त्याने सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू टाकत ३६ धावांत २ बळी टिपले.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सजोस बटलरइशान किशनयुजवेंद्र चहल
Open in App